रायवरील तपकिरी तांबेरा

राय

रायवरील तपकिरी तांबेरा

Puccinia recondita

बुरशी

थोडक्यात

  • पानाच्या पात्यांच्या दोन्ही बाजुला छोटे, गोलाकार, नारिंगी तपकिरी फोड येतात.
  • हे हळुहळु पिवळे होतात आणि नंतर तपकिरी होतात.

मध्ये देखील मिळू शकते

0 पिके

रायवरील तपकिरी तांबेरा

राय

लक्षणे

पानाच्या पात्यांच्या दोन्ही बाजुला छोटे, गोलाकार, नारिंगी तपकिरी फोड येतात. ह्यात बीजाणू असतात जे इतर राय रोपांमध्ये संक्रमण पसरवितात. फिकट पिवळे किंवा फिकट तपकिरी डाग पानाला वेढतात जे हळुहळु सुकतात. ह्या पिशव्यांमध्ये बीजाणू असतात जे यजमानांवर किंवा स्वयंभू रोपांवर जगतील आणि जीवनचक्र पुन्हा सुरु करतील.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बॅसिलस सबटिलिस, ट्रिकोडर्मा हॅरिझॅनियम बुरशी किंवा यिस्ट सॅचारोमायस सेरेविसेसारखे जैव नियंत्रक घटक वापरल्यासही रायच्या पानावरील तांबेर्‍याचे बरेच नियंत्रण होऊ शकते आणि धान्य उत्पन्नही वाढु शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्रोथियोकोनाझोलवर आधारीत संरक्षक बुरशीनाशकांचा वेळेत फवारा मारल्यास रायवरील तांबेर्‍याचे नियंत्रण करण्यात मदत होते. रायवरील तांबेर्‍याच्या उपचारांसाठी पुष्कळसे पानांवरील फवारे उपलब्ध आहेत. लक्षणे प्रथम दिसताच फवारे मारणे हा लक्षणे दडपण्याचा चांगला मार्ग आहे. जर हवामान तांबेर्‍याला अनुकूल असेल तर अतिरिक्त वापराचीही गरज भासु शकते.

कशामुळे झाले

पुसिनिया रेकॉन्डिटा नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जिला जगण्यासाठी जिवंत पेशींची गरज असते म्हणुन फक्त हिरव्या रोपांवरच वाढु शकते. जंगली राय, गहू आणि स्वयंभू रोपे ह्या जंतुंचे काही पर्यायी यजमान आहेत. अंकुरण्यासाठी पानांची आर्द्रता लागते आणि जेव्हा १००% आर्द्रता आणि ऊबदार हवामान (१५ अंश ते २२ अंश) असते तेव्हा चांगली फोफावते. तरीपण, बीजाणू उष्ण आणि कोरड्या काळात जगु शकत नाहीत. रायवरील गंभीर हल्ला हा मोसमाच्या शेवटाला होते, खास करुन जर नत्राची मात्रा जास्त दिली गेली असेल तर. उशीरा पेरलेल्यांपेक्षा लवकर पेरलेल्या रोपांवर जास्त गंभीर संक्रमण होते, खास करुन जेव्हा रात्रीचे तापमानही ऊबदार असते.


प्रतिबंधक उपाय

  • ह्या रोगाला टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रतिकारक वाण लावणे.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा