जाळे बनविणारा कोळी - टोमॅटो

टोमॅटो

जाळे बनविणारा कोळी

Tetranychidae


थोडक्यात

 • पानांवर बारीक ठिपके येतात.
 • फांदी आणि पानांच्या मध्ये बारीक जाळी आढळते.
 • पाने वाळून जातात.

लक्षणे

ह्या कोळ्याच्या उपद्रवामुळे पानांच्या वरच्या बाजूला पांढरे ते पिवळे ठिपके तयार होतात. पानांच्या खालच्या बाजुला अंडी चिकटुन असतात. हा कोळी स्वत:ही तिथेच असतो आणि कोष विणून आत राहतो जे जाळ्यसारखे दिसतात. उपद्रव अधिक तीव्र होऊ लागताच पाने पहिल्यांदा तांबूस किंवा चंदेरी दिसतात मग ठिसुळ होतात आणि शिरांमध्ये फाटतात आणि अखेरीस गळुन पडतात. हे कोळी जाळे विणून संपूर्ण झाडाच्या पृष्ठभागाला ह्या जाळ्यांनी वेढतात. फांद्यांची टोक सपाट दिसतात आणि बाजुने वाढ दिसते. जास्त उपद्रव झाल्यास फळे कमी प्रमाणात आणि कमी दर्जाची येतात.

सुरु करणारा

टेट्रांचस प्रजातीच्या मुख्यकरुन टी. युर्टिके आणि टी. सिन्नाबॅरिनस प्रजातींमुळे नुकसान उद्भवते. प्रौढ मादी ०.६ मि.मी. लांबीची, फिकट हिरव्या रंगाच्या लंबगोलाकार शरीराची असते ज्यावर दोन गडद चट्टे असतात आणि पाठीवर लांब केस असतात. विश्रांती घेत असलेल्या माद्या लालरस रंगाच्या असतात. वसंत ऋतुमध्ये माद्या पानांच्या खालच्या बाजुला गोल आणि अर्धपारदर्शक अंडी घालतात. पिल्ले फिकट हिरवी असतात आणि पाठीवर गडद ठिपके असतात. कोळी स्वत:ला पानाच्या खालच्या बाजुला कोश विणुन संरक्षित ठेवतात. कोरडे आणि उष्ण हवामान ह्यांना फार अनुकूल असते आणि ह्या हवामानात एका वर्षात त्यांच्या ७ पिढ्या वाढतात. तणांच्या समावेशासह ह्यांचे अनेक पर्यायी यजमान आहेत.

जैव नियंत्रण

लहानसा प्रादुर्भाव असल्यास, फक्त पानांवरुन कोळीला धुवून काढा आणि प्रभावित पाने काढून टाका. रेपसीड, बेसिल, सोयाबिन आणि नीम तेलांपासुन बनविलेले द्रावण पानांवर चांगले फवारा आणि टी. युर्कोटेके कोळ्यांची संख्या करा. कोळ्यांची संख्या कमी करण्यासाठी लसणी चहा, खाजकुयलीचे मिश्रण किंवा कीटनाशक साबणाचा द्राव वापरा. शेतात यजमानाप्रमाणे भक्षक कोळ्यांसह जैव नियंत्रण करा (उदा. फिटोसेलुलस परसिमिलिस) किंवा जैव कीटनाशके बॅसिलस थुरिंजिएनसिस वापरा.सुरवातीच्या गरजेच्या वापरानंतर २-३ दिवसांनी दुसर्‍यांदा उपचार वापर करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कोळीनाशक वापरुन ह्यांचे नियंत्रण करणे कठिण असते कारण बहुतेक कोळी विविध रसायनांचा काही वर्षांच्या वापरानंतर, प्रतिकार विकसित करतात. रासायनिक नियंत्रक काळजीपूर्वक निवडा जेणेकरुन ते भक्षकांच्या संख्येवर परिणाम करणार नाहीत. विरघळणारे गंधक (३ ग्रॅ/ली), स्पिरोमेसिफेन(१मि.ली./ली), डायकोफॉल (५मि.ली./ली) किंवा अॅबॅमेक्टिन वर आधारीत बुरशीनाशकांचा वापर केरा जाऊ शकतो, उदा. (पाण्याने सौम्य करुन). सुरवातीच्या गरजेच्या उपचारांनंतर २-३ दिवसांनी दुसर्‍यांदा उपचार फवारे मारा.

प्रतिबंधक उपाय

 • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाणांची निवड करा.
 • आपल्या शेताचे नियमित निरीक्षण करताना पानांच्या खालच्या बाजु तपासा.
 • किंवा पानांवरुन काही किड्यांना हलवुन पांढर्‍या कागदावर पाडा.
 • संक्रमित पाने किंवा झाडे काढुन टाका.
 • खाजकुयली आणि इतर तण शेतातुन काढुन टाका.
 • शेतात धूळ उडू नये म्हणुन पायवाटेवर आणि धुळीच्या भागात नियमित अंतराने पाणी शिंपडा.
 • ताणाखालील झाडे आणि रोपे कोळ्याच्या नुकसानास कमी सहनशील असल्यामुळे रोपांना नियमित पाणी द्या.
 • मित्रकिडींच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी कीटनाशकांचा नियंत्रित वापर करा.