सोयाबीन

पांढरी माशी

Aleyrodidae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर पिवळे ठिपके येतात.
  • बुरशी विकसित होते.
  • पाने गोळा होऊन किंवा वाटीच्या आकाराचे होऊन विकृत होतात.
  • झाडाची वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते

43 पिके

सोयाबीन

लक्षणे

शेतात आणि हरितगृहातील विविध पिकांवर पांढरी माशी सामान्यपणे आढळते. प्रौढ आणि पिल्ले झाडाचे रसशोषण करुन पान, फांद्या आणि फळांवर मधाळ रस सोडतात. त्यामुळे पानांच्या पात्यावर पिवळे ठिपके येऊन त्यावर बुरशी चढते. जास्त संक्रमण झाल्यास हे ठिपके एकमेकात मिसळतात आणि शिरांजवळील भाग सोडुन पूर्ण पानास व्यापतात. कालांतराने पान विकृत, गोळा झालेली किंवा वाटीच्या आकाराची होतात. पांढरी माशी टोमॅटोवरील घुबडा (बोकड्या) किंवा कॅसाव्हा ब्राऊन स्ट्रीक व्हायरस या रोगाला कारणीभूत असलेल्या विषाणूचे वहन करते.

Recommendations

जैविक नियंत्रण

पांढरी माशीची प्रजाती आणि लागवड केलेले पीक याप्रमाणे जैविक उपाय बदलतील. सीताफळ तेल (अॅनोना स्क्वॅमोसा), पायरेथ्रिन्स, कीटनाशक साबण, निंबोळीचा अर्क (एनएसकेइ ५%), नीम तेलावर (५ मि.ली./ली. पाणी) आधारीत नैसर्गिक किटकनाशकांची शिफारस केली जाते. तसेच एनकार्शिया फॉर्मोसा, एरेटमोसेरस एरेमिकस, सामान्य हिरवे लेसविंग्ज, क्रिसोपेर्ला कार्निया किंवा डेलफास्टस प्रजातीचे भुंगे या परजीवी वॅस्पसचा वापर सामान्यपणे केला जातो. शिकारी कोळी, सूत्रकृमि, हिरवे लेसविंग्ज, लेडीबर्डस, सूक्ष्म पायरेट बग्ज, बिग आइड बग्ज आणि डॅमसेल बग्ज इतर नैसर्गिक शत्रुत येतात. ब्युव्हेरिया बॅसियाना, इसारिया फ्युमोसोरोसे, व्हर्टिसिलियम लेकॅनि आणि पेसिलोमायसेस या जंतुजन्य बुरशी देखील वापरल्या जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पांढरी माशी सर्व कीटकनाशकांविरुद्ध खूप लवकर प्रतिकार निर्माण करते, म्हणुन वेगवेगळे उत्पाद फेरपालट करुन वापरण्याची शिफारस करण्यात येते. बायफेन्थ्रिन, ब्युप्रोफेझिन, फेनोक्सिकार्ब, डेल्टामेथ्रिन, अॅजाडिराक्टिन, लँब्डा सायहॅलोथ्रिन, सायपरमेथ्रिन, पायरेथ्रॉईडस पायमेट्रोझाइन किंवा स्पिरोमेसिफेनवर अधारीत संयुक्त कीटकनाशकांचा वापर करुन किड्यांचे नियंत्रण करावे.

कशामुळे झाले

पांढरी माशी सुमारे ०.८-१ मि.मी. लांबीची असते व शरीर आणि दोन्ही पंखांच्या जोड्या पांढर्‍या ते पिवळसर भुकटीसारख्या मेणाच्या स्त्रावाने आच्छादित असते. त्या बहुधा पानांच्या खालच्या बाजुला आढळतात आणि जर झाड हलविले तर पांढरी माशी थव्यांनी उडते. ऊबदार, कोरड्या हवामानात त्या फोफावतात. पानांच्या खालच्या बाजुला अंडी घातली जातात. पिल्ले पिवळी ते पांढरी, चपटी, अंडाकृत आणि फिकट हिरव्या रंगाची असतात. यजमान रोपांना न खाता, प्रौढ काही दिवसांपेक्षा जास्त काळ जगु शकत नाहीत. यामुळे यांच्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी तण व्यवस्थापनाचे महत्व वाढते.


प्रतिबंधक उपाय

  • पिवळे चिकट सापळे (एकरी २०) लाऊन शेताची निगराणी करा.
  • यजमान नसलेल्या पिकांसोबत आंतरपिक करा.
  • पांढर्‍या माशीला आकर्षित किंवा प्रतिबंध करणारी सोबती पिके (नॅस्ट्रियमस, झिनियास, हमिंगबर्ड बुश, पायनॅपल सेज, बी बाम) लावा.
  • मका, ज्वारी किंवा बाजरी सारखे उंच वाढणारे पिकांची मुख्य पिकाच्या कडेने दाट लागवड करा.
  • खूप लवकर किंवा खूप उशीर न करता योग्य वेळी लागवड करा.
  • दाट लागवड करा.
  • कोवळ्या रोपांचे पांढर्‍या माशीच्या लक्षणांसाठी नियमितपणे निरीक्षण करा.
  • संतुलित खते द्या.
  • विस्तृत श्रेणीची खते वापरु नका.
  • अंडी किंवा अळ्या असणारी पाने काढुन टाका.
  • संक्रमणाच्या सुरवातीच्या टप्प्यावर पांढर्‍या माशीला मोठ्या संख्येने पकडण्यासाठी चिकट सापळे लावा.
  • शेतातील आणि आजुबाजुचे तण आणि पर्यायी यजमान काढा.
  • हरितगृहातुन काढणीनंतर झाडांचे अवशेष काढा.
  • ऊबदार हवामानात काही काळ शेत पडिक ठेवा.
  • अतिनील किरणांना शोषणारे प्लास्टिकचे आवरण वापरल्यास संक्रमण कमी होते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा