तंबाखूवरील सुरवंट - आंबा

आंबा

तंबाखूवरील सुरवंट

Spodoptera litura


थोडक्यात

 • पानांवर आणि शेंगांवर खाल्ल्याची छिद्रे दिसतात.
 • पानगळ होते.

लक्षणे

नकतेच उबुन निघालेल्या अळ्या पानांवर वेगाने ताव मारतात, पाने कुरतडतात आणि झाडांवर पाने शिल्लक ठेवत नाहीत. प्रौढ अळ्या पसरतात आणि रात्रीच्या वेळी पानांवर उपद्रव करतात. दिवसा झाडाच्या बुडाजवळ जमिनीत लपुन रहातात. हलक्या जमिनीत अळ्या भुईमुगाच्या शेंगांपर्यंत किंवा मुळांपर्यंत पोचतात आणि त्यांना नुकसान करतात. खूप जास्त खाल्ल्याने झाडाच्या फक्त फांद्या आणि देठच शिल्लक रहातात. अळ्या आणि प्रौढ यांना १५ ते ३५ डिग्री सेल्शियसचे तापमान अतिशय अनुकूल असते. तरीपण त्यांना या श्रेणीतील उच्च तापमान आवडते.

सुरु करणारा

प्रौढ पतंगाचे शरीर राखाडीसर तपकिरी असते आणि पुढील पंख अगदी वेगळेच असतात ज्याच्या कडांवर पांढरी लाटांसारखी चिन्हे असतात. पाठचे पंख अर्धपारदर्शक असुन त्यावर तपकिरी रंगाच्या ओळी कडांवर आणि शिरांवर दिसतात. माद्या शेकड्यांच्या झुबक्यांनी अंडी पानाच्या वरच्या बाजूला घालतात ज्यावर सोनेरी तपकिरी खवले असतात. उबल्यानंतर केसरहित फिक्या हिरव्या रंगांच्या अळ्या पटकन पसरतात आणि पानांवर ताव मारायला सुरवात करतात. प्रौढ अळ्या गडद हिरव्या ते तपकिरी रंगाच्या असुन त्यांच्या छातीवर गडद ठिपके असतात आणि पोटाकडील भाग नितळ असतो. दोन पिवळे उभे पट्टे बाजुने असतात ज्यावर काळे त्रिकोणी डाग असतात. नारिंगी रंगाचा जाडा पट्टा या दोन डागांमधून जातो. अळ्या रात्रीच्या वेळी उपद्रव करतात आणि दिवसा जमिनीत लपुन बसतात. अळ्या आणि प्रौड १५ ते ३५ अंश तापमानात चांगल्या वाढतात, आदर्श तापमान २५अंश असते. कमी आर्द्रता आणि जास्त किंवा कमी तापमानामुळे प्रजोत्पादन कमी होते आणि त्यांचे जीवनचक्र लांबते.

जैव नियंत्रण

ट्रायकोग्रामा चिलोनिस, टेलेनोमस रेमस किंवा अपॅन्टेलिस अफ्रिकानस जातीचे पॅरासिटॉइड वॅस्पस अंडी किंवा अळ्या खातात. न्युक्लियर पॉलीहेड्रोसिस वायरस (एनपीव्ही) किंवा बॅसिलस थुरिंजिएनसिसवर आधारीत जैविक कीटनाशकेसुद्धा चांगल काम करतात. वैकल्पिकरित्या नोम्युराए रिलेयी किंवा सेराशिया मारसेसेनस सारख्या जंतुमय बुरशीची फवारणी सुद्धा केली जाऊ शकते. भाताचा कोंडा, तपकिरी साखर किंवा काकवीवर आधारीत अमिष द्रावण देखील जमिनीवर संध्याकाळी पसरली जाऊ शकतात. कडुनिंबाचा पाला किंवा निंबोळी वनस्पतींचे अर्क आणि पोंगमिया ग्लोब्रा बियाणांचा अर्क शेंगदाण्याच्या पानांवर स्पोडोप्टेरा लिट्यूरा अळी विरूध्द अत्यंत प्रभावी आहे. उदा. अॅझाडिराक्टिन १५०० पीपीएमला ५ मि.ली./ली या प्रमाणे किंवा एनएसकेइ ५% च्या या प्रमाणे अंड्याच्या टप्प्यावर वापरले जाऊ शकते ज्यामुळे अंडी ऊबण्यास प्रतिबंध होतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटकनाशकाच्या अतिरेकी वापराने या किड्यांमध्ये त्याचा प्रतिरोध निर्माण होईल. छोट्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी पुष्कळ प्रकारची कीटनाशके, उदा. क्लोरपायरीफॉस (२.५ मि.ली/ली), इमॅमेक्टिन (०.५ ग्रॅ./ली),फ्ल्युबेंडियामाइड (०.५ मि.ली/ली), किंवा क्लोरॅन्टानिलिप्रोल (०.३ मि.ली./ली) तसेच इंडॉक्सिकार्ब आणि बायफेनथ्रिनवर आधारीत उत्पाद वापरले जाऊ शकतात. आमिषातील द्रावणानेसुद्धा वयस्कर अळ्यांची संख्या, उदा. विषारी आमिषे (५ किलो भात कुसे + १/२ किलो गुळ + ५०० मि.ली क्लोरपायरीफॉस) लावून कमी केली जाऊ शकते.

प्रतिबंधक उपाय

 • आपल्या बाजारात सहनशील वाण शोधा.
 • या किड्यांची धाड टाळण्यासाठी लवकर पेरणी करा.
 • मध्य मोसमातील दुष्काळ टाळण्यासाठी नियमित पाणी द्या.
 • बांधाच्या आजूबाजूने सूर्यफूल, टॅरो आणि एरंडी सारखे सापळा पीक लावा.
 • किडींना पळवुन लावणारी ऑसिमम प्रजातीची (बॅसिलिकम) रोपे लावा.
 • शेतात पुष्कळ जागी पक्षी थांबे तयार करा.
 • पतंगांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश किंवा कामगंध सापळे लावा.
 • शेताचे उपाद्रवाच्या लक्षणांसाठी म्हणजे अंड्याचे झुबके, खाण्याने झालेले नुकसान किंवा अळ्या असणे वगैरेंसाठी नियमितपणे निरीक्षण करा.
 • सापळा व यजमान पिकातील अंड्यांचे झुबके आणि अळ्या शोधून नष्ट करा.
 • पेरणी नंतर १५-२० दिवसांनी तण काढा.
 • लागवड करते वेळेस रोपांना काळजीपूर्वक हाताळा आणि त्यांना कसल्याही प्रकारची इजा होऊ नये याची काळजी घ्या.
 • शेती उपयोगी अवजारे निर्जंतुक करून वापरा.
 • खोल नांगरा ज्याने स्पोडोप्टेराचे कोष नैसर्गिक शत्रुंना उपलब्ध होतील आणि हवामानसंबंधी घटकांमुळे नष्ट होतील.