भात

भातामधील लोहाची विषबाधा

Iron Toxicity

इतर

5 mins to read

थोडक्यात

  • झाडांच्या पेशीत लोह जास्त जमा झाल्याने पाने तपकिरी किंवा तांबट रंगाची होतात.
  • जमिनीतही लोहाची तीव्रता वाढल्याने मुळांचे स्वास्थ्य बिघडते आणि इतर आवश्यक पोषके कमी शोषली जातात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

पीकाच्या वाढीच्या सर्व टप्प्यावर लोहाची तीव्रता होऊ शकते. जगातील सर्व समुद्रसपाटीच्या भागातील भातशेतीत ही होते. वाढीव शोषण आणि रोपाच्या पेशीत जास्त लोह जमा होणे ह्यामुळे विषारीपणा तयार होतो. ह्यामुळे क्लोरोफिल आणि शारीरिक प्रक्रियांत बिघाड होतो, परिणामी पाने तपकिरी किंवा तांबट होतात. मुळाजवळील भागात उच्च लोहाच्या तीव्रतेमुळे मुळांचे स्वास्थ्य बिघडते आणि इतर महत्वाच्या पोषकांचे शोषण नीट होत नाही. ह्याचा संबंध पीकाच्या (१०-१००%) नुकसानाशी असतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या विकृतीसाठी कोणतेही जैव नियंत्रण उपलब्ध नाही.

रासायनिक नियंत्रण

ज्या जमिनीत आणि हवामानात जिथे लोहाची तीव्रता ही समस्या होऊ शकते तिथे ही विकृती टाळण्यासाठी खतांचा संतुलित वापर (खासकरुन पलाश) आणि चुनकळी देणे महत्वाचे असते. खतांच्या मिश्रणांत मँगनिज घातल्यासही रोपांचे लोहाचे शोषण कमी करण्यात मदत होऊ शकते. आम्ल जमिनीत चुनकळीची उच्च शिफारस केली जाते. ज्या जमिनीत जास्त प्रमाणात लोह आणि सेंद्रिय बाबी आहेत आणि पाण्याचा निचरा चांगला नाही तिथे सेंद्रिय बाबी (शेणखत, गवत) देणे टाळा. युरियाला नत्र खत (कमी आम्लिक) म्हणुन अमोनियम सल्फेट (जास्त आम्लिक) ऐवजी वापरा.

कशामुळे झाले

रोपाच्या मुळाजवळ लोहाचा भरणा असल्यासही रोपात लोहाची तीव्रता दिसुन येते. ह्या विकृतीचा संबंध पाणी भरलेल्या शेताशी आहे आणि समुद्रसपाटीजवळील भातशेतीच्या उत्पादनांवर मुख्यत: प्रभाव पडतो. पाणी भरलेल्या जमिनीत लोहाचा भरणा जास्त केंद्रीत होतो तसेच रोपाचे ते शोषुन घेण्याचे प्रमाणही वाढते. मोठ्या प्रमाणात आम्ल जमिनी, जमिनीत प्राणवायू खेळणे आणि कसाची पातळीही ह्या पोषकाच्या जमा होण्यात आणि शोषुन घेण्यात कारण ठरते. ज्या पाणी भरलेल्या जमिनींचा सामू ५.८ पेक्षा कमी असतो आणि जेव्हा जमिनीतील हवा (सामान्य प्राणवायूची पातळी) आणि सामू ६.५ च्या खाली असतो आणि जेव्हा जमिनीतील हवा कमी (प्राणवायूचे प्रमाण कमी) तिथे लोहाची तीव्रता दिसुन येते. उचित व्यवस्थापन पद्धतीत मातीचे लाइमिंग करणे, जमिनीचा कस वाढविणे, आणि पीकाच्या वाढीच्या ठराविक टप्प्यावर पाण्याचा निचरा करणे येतात. मँगनिज लोहाबरोबर स्पर्धा करीत असल्याने ह्या सूक्ष्म पोषकाचा अजुन भरणा केल्यास रोपे लोहाचे शोषण काही प्रमाणात कमी करतील.


प्रतिबंधक उपाय

  • जमिनीतील तीव्र लोहाच्या पातळीस सहनशील वाण लावा.
  • जर थेट पेरणी करीत असाल तर बियाणांना ऑक्सिडंटनी (लोहाच्या प्रभावाला रद्दबादल करणारा पदार्थ) आवरण करा.
  • लोहाच्या तीव्रतेची उच्च पातळी निघुन जाईपर्यंत ( पाणी भरल्यानंतर १०-२० दिवस) पेरणी पुढे ढकला.
  • पाण्याचा चांगला निचरा न होणार्‍या जमिनीत ज्यात एफइ आणि सेंद्रिय पदार्थांचा जास्त भरणा आहे, त्यात अधुनमधुन पाणी भरा.
  • शक्यतो पिकाच्या पहिल्या टप्प्यात ( पेरणी/रोपणी केल्यानंतर २५-३० दिवसांनी) साठलेल्या लोहाचा निचरा करण्यासाठी पाण्याचा निचरा करा.
  • पीक घेतल्यानंतरही नांगरणी चालूच ठेवा, शक्य असल्यास काही दिवसांसाठी किंवा अठवड्यासाठी जमिन पडिक ठेवा.
  • आम्ल जमिनीचा सामू वाढविण्यासाठी वरच्या मातीत चुनकळी मिळवा.
  • अतिरिक्त मँगनीज खते द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा