प्लँटिक्स कीड ट्रॅकर

भारतात लष्करी अळीचा तीव्र प्रसार झाल्यामुळे आम्ही आमच्या तंत्रज्ञानासह शक्य तितक्या चांगल्या आणि परिणामकारक पद्धतीने आपल्याला कशी मदत करू शकतो याबद्दल विचार केला. अशा प्रकारे आम्ही आपल्याला आक्रमक कीटकांचा लगेच मागोवा घेण्यासाठी आमचे नविन साधन "प्लँटिक्स कीड ट्रॅकर" सादर करतो. भारतातील सर्वात सामान्य आणि आक्रमक कीटक आणि आजारांच्या जास्तीत जास्त नकाशांसह आम्ही हळू हळू या साधनाचा विस्तार करू, जेणेकरून आपल्याजवळील विश्र्वसनीय विश्र्वासार्ह चेतावणी प्रणाली नेहमीच अद्ययावत असेल.

डेटा स्रोत: आमच्या शेतकरी अॅप प्लँटिक्ससह, आम्हाला दररोज २० हजारांपेक्षा अधिक प्रतिमा फक्त भारतातुन मिळतात. आम्ही ही माहिती ज्ञानासाठी वापरतो आणि सर्व अंतर्भाग धारकांसह सामायिक करतो. हे सर्व डेटा पॉईंट्स थेट ट्रॅकिंग नकाशात दर्शविले जातात जे तज्ञांनी प्रमाणित केलेले आहेत. सर्व निर्देशांक सुमारे १० किमीच्या अंतरासाठी अनामिक आहेत आणि डेटा दररोज अद्यतनित केला जातो. कच्चा डेटा प्राप्त करण्यासाठी किंवा नकाशावर आपला डेटा जोडण्यासाठी, कृपया contact@peat.ai शी संपर्क करा.