द्वीदल धान्य

घेवडा पिकावरील सोनेरी मोझाईक व्हायरस

BGMV

विषाणू

5 mins to read

थोडक्यात

  • ठळक पिवळ्या शिरांमुळे पाने जाळी सारखी दिसतात कारण पिवळ्या शिरा हिरव्या पानांवर उठुन दिसतात.
  • पाने खालच्या बाजुला मुडपलेली असुन त्यांची वाढ चांगली होत नाही.
  • पृष्ठभाग जाडआणि ताठर होतो.

मध्ये देखील मिळू शकते


द्वीदल धान्य

लक्षणे

त्रिभुज पानांवर बहुधा पहल्यांदा लक्षणे दिसतात. ठळक पिवळ्या शीरा नविन येणाऱ्या पानांवर दिसतात. शिरांमधील पिवळेपणा अजुन वाढत जातो आणि पाने पिवळ्या शिरा आणि गडद पानांचा भाग यामुळे वैशिष्ट्यपूर्ण जाळीसारखी दिसतात. नंतर पिवळेपणा पसरतो आणि विखुरलेल्या पिवळ्या छटेच्या नक्षीने उरलेल्या पानास ग्रस्त करतो. लक्षणे दिसु लागल्यानंतर नवीन येणारी पाने विकृत, मुडपलेली, ताठर आणि जाड येतात. शेंगा वाढत नाहीत आणि खालच्या दिशेने मुडपु लागतात. ज्या झाडांना खूप लवकर रोगाची लागण झाली आहे त्यांना शेंगा खूप कमी लागतात आणि दाण्यांचे उत्पादन तसेच प्रत देखील खूप कमी असते.

Recommendations

जैविक नियंत्रण

इरेसिन हर्बस्टीच्या (हर्बस्टची लाल पाने) पानांचा अर्क आणि फिटोलाका थ्रिसिफ्लोराचा वापर थोड्या प्रमाणात विषाणूच्या संक्रमणास बाधीत करतो आणि परिणामी शेतात घटना कमी होतात. ब्युव्हेरिया बसानिया या मित्र बुरशीच्या अर्कात कीटकनाशक मूल्ये आहेत जी बेमिशिया टाबासिच्या प्रौढ, अंडी आणि पिल्लांविरुद्ध काम करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विषाणूजन्य रोगांसाठी कोणतेही रसायनिक उपचार उपलब्ध नाहीत. पांढर्‍या माशीच्या नियंत्रणासाठी फार थोडे उपचार परिणामकारक आहेत.

कशामुळे झाले

बेमिशिया टाबासी नावाच्या पांढर्‍या माशी द्वारे सातत्याने विषाणूंचे वहन केले जाते. झाडाला शेतकाम करताना झालेल्या इजा मधून देखील संक्रमण होऊ शकते. विषाणू एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर पद्धतशीरपणे जात नाही, किंवा तो बियाणेजन्य किंवा परागजन्य देखील नाही. जेव्हा स्वयंभू रोपे किंवा यजमान तण शेतात असतील तर घेवडा पिकांना लागण होते. झाडाच्या वहन व्यवस्थाभागात विषाणूंची संख्या वाढते ज्यामुळेच प्रथम शिराच का प्रभावित होतात ते कळते. दृष्य लक्षणे उमटणे आणि त्यांची गंभीरता याला सुमारे २८ अंशाचे वाढीव तापमान अनुकूल असते. थंड हवामानात (सुमारे २२ अंश) विषांणूंची संख्या कमी वाढते आणि लक्षणांचा विकास मंदावतो.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या बाजारात प्रतिकारक वाण शोधा.
  • शेतातील आणि आजुबाजुचे तण तसेच पर्यायी यजमान काढा.
  • पांढर्‍या माशीला झाडीत शिरता येऊ नये म्हणुन दाट लागवड करा.
  • पांढर्‍या माशीची लोकसंख्या कमी करण्यासाठी जमिनीवर आच्छादन करा.
  • यजमान नसणार्‍या पिकांबरोबर पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा