द्वीदल धान्य

घेवड्यावरील माशी

Ophiomyia phaseoli

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर ठिपके असतात.
  • रुपेरी, नागमोडी पट्टे पर्णकोषांवर असतात जे नंतर गडद होतात.
  • पाने वाळुन गळतात.
  • छोट्या गडद रंगाच्या माशा दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


द्वीदल धान्य

लक्षणे

कोवळ्या पानांवर , खासकरुन पानाच्या बुडाशी वरच्या बाजुला खूप संख्येने छिद्र आणि फिकट पिवळे ठिपके दिसतात. अळ्या पानांच्या देठातुन आणि फांद्यातुन पोखरतात जे नंतर रुपेरी, नागमोडी पट्टे म्हणुन नजरेस पडतात. पानांच्या वरच्या बाजुला फक्त काही बोगदेच दिसतात, जे नंतर गडद तपकिरी होतात आणि स्पष्ट मरगळ दिसते. ही पाने वाळतात आणि गळतात. फांद्यांवर खाल्ल्याचे बोगदे स्पष्ट दिसतात. अळ्यांच्या अति खाण्याने मूळ खोडाच्या बुंध्याच्या आतील भाग नष्ट होतात ज्यामुळे पाने पिवळी पडतात, झाडाची वाढ खुंटते आणि रोपमरही होते. ऊगवणीनंतर सुमारे १०-१५ दिवसात झाड बहुधा मरतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

घेवडा पिकांवरील माशीचे नैसर्गिक शत्रू अनेक आहेत.आशिया आणि आफ्रिकेत ओपियस प्रजातींचे भक्षण करणार्‍या पुष्कळशा परजीवी ब्रॅकोनिड वॅस्पच्या अळ्यांचा वापर व्यापकपणे केला जातो. दोन प्रजाती ओपियस फासौली आणि ओपियस इंपोर्टसना पूर्व आफ्रिकेतील हवाई मध्ये १९६९ला शेतात सोडले होते, पण तरीही अजुनही घेवडा पिकांवरील माशीचे उद्रेक क्वचित होतच असतात. काही भागात ह्या उपद्रवाचा मृत्यूदर ९०%पर्यंतही पोचतो. पूर्व आफ्रिकेत उपद्रव व्यवस्थापनाचा प्रकार म्हणुन माशीच्या बुरशी जंतुंवर आधारीत उत्पादही वापरले गेलेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर संक्रमण फार गंभीर असेल तर घेवडा पिकांवरील माशांच्या नियंत्रणासाठी कीटनाशके वापरावीत. पण ज्या अळ्या नुकसान करतात त्या झाडाच्या आत सुरक्षित असतात. पेरणी करतानाच किंवा ऊगवणीनंतर ३-४ दिवसात इमिडाक्लोप्रिड असणारे रसायनिक उत्पाद जर मातीत फवारले तरी चांगला प्रभाव मिळतो. कोवळ्या रोपांवर ऊगवणीनंतर ३-४ दिवसांनी उपचार करावेत आणि जर घेवडा पिकांवरील माशांचे संक्रमण फारच गंभीर असेल तर ७ दिवसांनी परत फवारणी घ्यावी आणि शक्य झाल्यास १४ दिवसांनीही परत करावी. सामान्यपणे वापरले जाणारे अन्य सक्रिय घटक आहे डायमिथोएट जे आंतरप्रवाही आहे. वर नमुद केलेली सर्व रसायने धोकादायक आहे आणि ह्याची हाताळणी फारच काळजीपूर्वक केली जावी.

कशामुळे झाले

जगाच्या सर्वात विध्वंसक उपद्रवांपैकी एक, ओफिओमिया फेजोलि, बीन माशीच्या अळ्या आणि प्रौढांमुळे लक्षणे दिसतात. हे आशिया, आफ्रिका, हवाई आणि ओशिनियाच्या उष्ण आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये व्यापक आहेत. काही प्रकरणांमध्ये, यामुळे 30-50% नुकसान उद्भवू शकते. नुकसानाची तीव्रता हंगामी असल्याचे दिसते, ज्यामुळे कोरड्या हंगामात ओल्या हंगामापेक्षा जास्त मृत्यूदर दिसतो (अनुक्रमे 80% व 13%). प्रौढ आणि अळ्या, खासकरुन कोवळ्या रोपात खूप नुकसान करतात. प्रौढ कोवळ्या पानांत छिद्रे करतात आणि पानाच्या देठाजवळ पांढरी, अंडाकृती अंडी घालतात. विकसित होणार्‍या अळ्या फांदीतुन बोगदे करत सोटमुळापर्यंत पोचतात आणि कोषात जाण्यासाठी खोडाच्या बुडाजवळील मातीत परत येतात. कोषाचा काळ हा तापमानाप्रमाणे सुमारे १०-१२ दिवसांचा असतो.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास, प्रतिरोधक वाण लावा.
  • ओल्या मोसमात लागवड करा.
  • लागवड करण्यापूर्वी, खास करुन शेंगवर्गीय कुटुंबातील स्वयंभू वनस्पती आणि तण काढा.
  • तेच वाण किंवा घेवड्यातील इतर वाण लावलेल्या जुन्या पिकांच्या बाजुने घेवड्याची लागवड करु नका.
  • लागवड करताना रोपांतील अंतर शक्य तितके लांब राखा.
  • वाढीच्या लवकरच्या काळात (ऊगवणीनंतर २-३ अठवडे) मुळांवर पालापाचोळा उदा.
  • केळीची पाने, भाताचे कांडे किंवा गवत पसरुन झाका.
  • ऊगवणीनंतरच्या पहिल्या चार ते पाच अठवड्यात नुकसानाचे निरीक्षण करुन उपद्रवाचे नियंत्रण करा.
  • काढणीनंतर पिकाचे अवशेष गोळा करुन जाळा किंवा गाडा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा